Monday, May 23, 2011

एका प्रेयसीची व्यथा .......

नाही वाटत जगावस तू सोबत नसताना,
किती विरह सहन करू तू जवळ असताना,
मी समोर येता तू तोंड फिरवून घेतोस,
तू होणार नाहीस माझा याची का जाणीव करून देतोस....

कधी काळी माझ्याविना तुला करमत न्हवत,
कस जगाव माझ्याविना तुला समजत न्हवत,
का माझ्या प्रेमाला नाकारुन गेलास,
माझ्या सर्व स्वप्नाना असा लाथाडून गेलास.......

तू जगशील ही माझ्याविना पण मी कशी जगू,
स्वप्नातल्या राजकुमारात चित्र कुणाचे बघू,
जाता जाता देवाकडे एकच मागेन दुवा,
देवा या प्रेमा मध्ये आणू नको दुरावा...
देवा या प्रेमा मध्ये आणू नको दुरावा...

कवी - राहूल

No comments:

Post a Comment