अशी बायको मला हवी........
मला बायको हवी बायको,
साधी सरळ, नको बिलकुल सायको,
माझे काही चुकले तरी,
कधी माझ्यावर न भडको,
माझ्याशी गोड बोलणारी हवी,
माझे सर्व एकाणारी, अशी बायको मला हवी ...........१
मिळून मिसळून राहणारी,
सर्व काम करणारी,
किती राग आला तरी,
खोट खोट हसणारी,
मनाने स्फटिका प्रमाणे निर्मळ हवी,
पण दिसायला सुंदर, अशी बायको मला हवी.............२
असावी ती शांत,
तिला नसावी कुठली खंत,
शंका कुशंकाचा तिने,
कधी काढावा ना ग्रंथ,
सारखे वार बघत, कधी उपास करणारी नसावी,
पण स्वयंपाकात सुगरण, अशी बायको मला हवी............३
घरातल गुपित घरात ठेवणारी,
इतरांच बिलकुल न एकणारी ,
घरातील ऐट मात्र,
मोट्या मानाने सांगणारी ,
घरच्यांची सेवा करणारी, सून आई वडिलांना हवी,
पण मनाने मोठी, अशी बायको मला हवी.................४
------------कवि - राहूल

************************************************
जादू ही अशी झाली कशी ?
स्वप्नी माझ्या ती आली कशी
माझ्या जवळ बसली कशी
मला पाहून हसली कशी
जादू ही अशी झाली कशी ॥
काय तीच रूप होत
sचेहऱ्यावर तिच्या तेज होत
इतकी तेजस्वी झाली कशी
जादू ही अशी झाली कशी ॥
गुलाबा सारखे गाल होते
ओठ ही लाले लाल होते
गालावर खळी पडली कशी
जादू ही अशी झाली कशी ॥
हरणा सारखे डोळे होते
मन तिचे भोळे होते
ही सौंदर्य राणी आली कशी
जादू ही अशी झाली कशी ॥
माझ्याशी येऊन बोलून गेली
काळीज माझ ती चोरून गेली
तिच्यावर प्रित ही जडली कशी
जादू ही अशी झाली कशी ॥
तिच्यासाठी मी वेडा झालो
भेटीसाठी तिच्या धडपडू लागलो
मला तळमळत ठेवून गेली कशी
जादू ही अशी झाली कशी ॥
कुठे ती निघून गेली
घायाळ माला करून गेली
संसारात या लपली कशी
जादू ही अशी झाली कशी ॥
-------कवि -- राहूल
**********************************************
दुसऱ्यासाठी जगून बघ
खूप जगलास स्वतासाठी, आज दुसऱ्यासाठी जगून बघ
खूप राबलास स्वतासाठी, आज दुसऱ्यासाठी राबून बघ
खूप रडवलस दुसऱ्याला, आज दुसऱ्यासाठी रडून बघ
खूप हसलास दुसऱ्यावर, आज दुसऱ्यासाठी हसून बघ
खूप झोपलास खाटेवर, आज जमिनीवर तु झोपून बघ
खूप जपलस स्वताला, आज दुसऱ्याला तु जपून बघ
खूप झाला तो झगमगाट, आज घरी दिवे लावून बघ
खूप झाल ते फास्ट फूड, मीठ भाकर तर खावून बघ
खूप झाल गाडीने फिरण, आज पायी चालून बघ
खूप झाल ऐ सी मध्ये बसण, आज उन्हात घाम गालून बघ
सुखात फक्त सहभागी झालास, कधी दुखात साथ देऊन बघ
जखमेवर फक्त मीठ चोळलस, कधी हलूवार फुंकर घालून बघ
खूप आदर केलास स्वताचा, आज दुसऱ्याचा आदर करून बघ
खूप मेलास स्वतासाठी, आज दुसऱ्यासाठी मरून बघ
------- कवी - राहूल

No comments:
Post a Comment